
-राजू नरवडे
संगमनेर : आश्वी बुद्रुक येथे नवीन अपर तहसील कार्यालय प्रस्तावित असून, यामध्ये शहरालगतच्या संगमनेर खुर्द व समनापूर या महसूल मंडळांचा देखील समावेश केला आहे. यामुळे ही गावे दूरवरच्या आश्वीला जोडली जाणार आहे. यातून नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासन आणि सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे. यावर विद्यमान आमदार अमोल खताळ यांनीही जनतेला विचारल्याशिवाय अंतिम निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यातच पठारभागातील जनतेने घारगाव येथे हे कार्यालय करावे, अशी मागणी केली आहे. परंतु, जेव्हापासून प्रस्तावाचे पत्र समाज माध्यमांवर आले तेव्हापासून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असल्याचे पहायला मिळत आहे.