नगर महापालिका : शिवसेनेचे नाव न घेता राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 November 2020

तपोवन रस्त्याच्या कामास नव्याने सुरवात झाली आहे. जोपर्यंत हा रस्ता दर्जेदार आणि मजबूत होत नाही. तोपर्यंत आम्ही जनतेसाठी आंदोलन करत राहणार.

नगर : तपोवन रस्त्याच्या कामास नव्याने सुरवात झाली आहे. जोपर्यंत हा रस्ता दर्जेदार आणि मजबूत होत नाही. तोपर्यंत आम्ही जनतेसाठी आंदोलन करत राहणार. ज्या राजकीय लोकांनी रस्त्यासाठी कुठला निधीही आणला नाही ते आज या रस्त्यावर निर्लज्जपणे फिरत आहेत. ही शरमेची बाब आहे, असे टिकास्त्र अहमदनगर महापालिकेतील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी शिवसेनेचे नाव न घेता सोडले. 

तपोवन रस्त्याच्या कामाची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. 4) पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. बाळासाहेब पवार, डॉ. सागर बोरुडे, नितीन बारस्कर, निखिल वारे, योगेश ठुबे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

बारस्कर म्हणाले, की तपोवन रस्त्यासाठी अनेक वर्षांपासून आमदार संग्राम जगताप, आम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक हा रस्ता उत्कृष्ट दर्जाचा होण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. त्यासाठी अनेक आंदोलने केली. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्यानंतर काही ठिकाणी हा रस्ता खराब झाल्याने आम्ही आंदोलन केले होते.

त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याने पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम पुन्हा नव्याने सुरू करण्यात येईल असे पत्र दिले. आज हे काम नव्याने सुरू झाले असून हा रस्ता जोपर्यंत दर्जेदार होत नाही तोपर्यंत आम्ही या रस्त्यासाठी आंदोलन करत राहणार आम्ही केलेल्या पाठपुराव्याचे इतर कोणीही श्रेय घेऊ नये, असे बारस्कर म्हणाले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The politics story of nagar corporation Criticism of NCP leader without mentioning Shivsena name