शहरानजीकच्या वसंत लॉन्सच्या सभागृहात घेतलेल्या या प्रशिक्षण वर्गात तहसीलदार अमोल निकम यांनी मार्गदर्शन केले. याअंतर्गत, पीपीटीद्वारे केलेल्या सादरीकरणातून निवडणुकीशी संबंधित कायदेशीर तरतुदी, करावयाची कामे, कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली, तसेच मतदानासाठी वापरावयाची यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
संगमनेर (अहमदनगर) : तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, 18 जानेवारी रोजी निकाल घोषित होणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवासाठी प्रशासन सज्ज झाले असून, निवडणुकीच्या कामात सहभागी होणारे दोन हजार 60 अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मंगळवारी प्रथम प्रशिक्षण देण्यात आले आहे.
शहरानजीकच्या वसंत लॉन्सच्या सभागृहात घेतलेल्या या प्रशिक्षण वर्गात तहसीलदार अमोल निकम यांनी मार्गदर्शन केले. याअंतर्गत, पीपीटीद्वारे केलेल्या सादरीकरणातून निवडणुकीशी संबंधित कायदेशीर तरतुदी, करावयाची कामे, कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली, तसेच मतदानासाठी वापरावयाची यंत्रे हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या कार्यशाळेकडे सुमारे 37 प्रशिक्षणार्थींनी पाठ फिरवली. गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. पुढील प्रशिक्षण मंगळवारी (ता. 12) आयोजित केल्याचे निकम यांनी सांगितले.