रस्त्यावर टाकलेल्या डाळींबाने घेतला होता ११ गायीचा बळी... अन्‌ आता

सुहास वैद्य 
Saturday, 8 August 2020

रस्त्यावर फेकून दिलेली खराब व विषारी डाळिंब जनावरांच्या जीवावर बेतली आहेत. गेल्या आठवड्यात अशी डाळिंब खाल्यामुळे 11 गायी व दोन गाढवांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना रस्त्यावर डाळिंब टाकून देण्याचे प्रकार घडला आहे.

कोल्हार (अहमदनगर) : रस्त्यावर फेकून दिलेली खराब व विषारी डाळिंब जनावरांच्या जीवावर बेतली आहेत. गेल्या आठवड्यात अशी डाळिंब खाल्यामुळे 11 गायी व दोन गाढवांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना रस्त्यावर डाळिंब टाकून देण्याचे प्रकार घडला आहे. आता डाळिंब फेकून देण्यासाठी प्रवरा नदीपात्र व सोनगाव रस्त्यावरील पोहीच्या जवळच्या जागेचा वापर सुरू केला आहे. 

कोल्हार व भगवतीपूर ग्रामपंचायतीनी त्याकडे गांभीऱ्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे. चांगली फळे विकायची त्यातून भरपूर पैसा कमवायचा परंतु खराब फळे आपण कोठे व कसा टाकतो ते खाल्ल्याचे जनावरांवर व पर्यावरणावर काय दुष्परिणाम होतात. याचे भान संबंधिताना राहिल्याचे दिसत नाही.

गेल्या आठवड्यात कोणीतरी कोल्हार लोणी रस्त्याच्याकडेला खराब डाळिंब फेकून दिले होते. ते खाल्ल्यामुळे 11 चराऊ गिरगायी मरण पावल्या. त्यामुळे परप्रांतीय गोपालकांचे मोठे नुकसान झाले होते. परंतु झालेले नुकसान निमुटपणे सहन करण्यापलीकडे त्यांच्या हातात काहीच उरले नाही. त्यांनी काही स्थानीक पदाधिकाऱ्यांकडे मदतीची अपेक्षा केली होती, असे असले तरी त्यांच्यावर अशी दुदैवी वेळ पुन्हा येणार नाही. याची खबरदारी खराब फळे फेकुण देणाऱ्यांनी आवश्यक आहे. 

खराब फळ खड्डा घेवून पुरून टाकली तरी जनावरांचे बळी जाणार नाहीत. आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. शेतकरी असोत किवा व्यापारी त्यांना प्रवरा नदीचे पात्र हीच खराब फळे डाळिंब फेकून देण्यासाठी सोयीचे ठिकाण सापडले आहे. नदीपत्रात आधीच कुजलेला घनकचरा,मृत जनावरे ,यामुळे कचरा कुंडीचे स्वरूप प्राप्त झालेले असताना त्याठिकाणी खराब डाळिंबाची भर पडली आहे. ते कोण आणून टाकतात. याबाबत ग्रामपंचायतींचे मात्र कानावर हात आहेत. त्याठिकाणच्या कचऱ्यामुळे सुटलेल्या दुर्गंधीमुळे दशक्रियाविधीला जाणेही गावकऱ्यांना मुश्कील झाले आहे.

महेंद्र कुंकूलोळ म्हणाले, डाळिंब उत्पादक शेतकरी खराब झालेली डाळिंब पालापाचोळ्या प्रमाणेच खड्यात पुरली तर त्याचा कंपोस्ट खत म्हणून उपयोग होवू शकतो. पावसामुळे डाळींबावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बुरशीनाशक व कीटकनाशकांची फवारणी केले आहे, अशी टाकावू विषारी डाळिंब खाल्ल्यामुळे विषबाधा होवू शकते.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pomegranates are being dumped in the Pravara river Kolhar and Bhagwatipur Gram Panchayats should pay attention