गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे : पवार 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 November 2020

सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास गावात विविध विकासकामे होतील.

भाळवणी (अहमदनगर) : सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास गावात विविध विकासकामे होतील. गावातील सर्व समस्या व प्रश्न सुटण्यास मदत होईल. त्यातून गावाचा विकास वेगाने होऊ शकतो, असे प्रतिपादन आदर्श गाव प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले. 
राज्य सरकारच्या आदर्श गाव योजनेअंतर्गत निवड झालेल्या बाजारतळावरील रस्त्याच्या बाजूच्या कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते नुकतेच झाले. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विकास रोहोकले, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले, मंजाभाऊ चेमटे, भानुदास तरटे, रंगनाथ रोहोकले, अशोक रोहोकले, सरपंच लीलाबाई रोहोकले, उपसरपंच संदीप ठुबे, संदीप भागवत, अविनाश राऊत, रेवणनाथ रोहोकले, मंगेश काळे, दत्तात्रेय चेमटे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, की युवकांनी गावातील विकासकामांची धुरा हातात घेतली, तर चांगली कामे होऊ शकतात. सर्वांनी संघटित होऊन विकासकामे केली, तर गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.'' 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Popatrao Pawar appeal to come together for the development of the village