esakal | धोका वाढला! एकाच कुटुंबातील सापडू लागले सर्व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Possibility of lockdown again in Shrirampur taluka

श्रीरामपूर शहरासह तालुक्‍यात दोन दिवसांत 50 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने वाढ झाली.

धोका वाढला! एकाच कुटुंबातील सापडू लागले सर्व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (अहमदनगर) : शहरासह तालुक्‍यात दोन दिवसांत 50 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने वाढ झाली, तर चौघांचा मृत्यू झाला. कोरोना संसर्गाची झपाट्याने वाढणारी साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांसाठी शहरात पूर्णतः लॉकडाउनची मागणी विविध घटकांतून होत आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. 9) पालिकेत सर्वपक्षीय बैठक होणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या सर्वत्र अनलॉक नियमावली लागू आहे. लॉकडाउन शिथिलतेनंतर शहरातील बाजारपेठा खुल्या करण्यात आल्याने गर्दी वाढून कोरोनाचा संसर्गही झपाट्याने पसरत आहे. यातून लॉकडाउन काळात घेतलेल्या खबरदारीवर जण पाणी फेरले गेले. सध्या शहरातील नागरिकांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आहे. अनेकांनी तर मास्क वापरणेही सोडले आहे. वाढत्या संसर्गामुळे एकाच कुटुंबातील सारे सदस्य पॉझिटिव्ह आढळू लागले.

रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला असून, रुग्णांना उपचार मिळणेही कठीण होत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात लॉकडाउन जाहीर करण्याबाबत बुधवारी सकाळी अकराला सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष बैठक होणार असून, तीत सहभागी होऊन मार्गदर्शन करावे, नियमांचे पालन करून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले. 

संपादन : अशोक मुरुमकर