
अहिल्यानगर : भारतीय डाक विभागाने अत्याधुनिक डिजिटल युगाशी नाते जोडत आपल्या ग्राहकांसाठी पेपरलेस केवायसी प्रक्रियेसह आधार बायोमेट्रिक प्रमाणिकरण वापरण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकांना त्यांचे एकल पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक (POSB) खाते उघडणे आणि सेव्हिंग्ज खात्यामध्ये सुरक्षित आणि जलद व्यवहार करणे यापुढे अधिक सोयीस्कर होणार आहे.