
शिर्डी : निमगाव येथील गणेश जाधव (वय ३२) यांचा साई संस्थान रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे दोन्ही डोळे साई संस्थान नेत्रपेढीला दान करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच पुढील कार्यवाही करून नेत्रपेढीतील डॉक्टरांनी हे दान स्वीकारले. या अनोख्या दानातून आता किमान दोन अंध रुग्णांना दृष्टी मिळू शकेल.