रायगडमध्ये वीजवितरण सुरळीत होणार : तनपुरे 

prajakt tanpure
prajakt tanpure

राहुरी : निसर्ग चक्रीवादळाचा रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक व नगर जिल्ह्याला मोठा फटका बसला. रायगड जिल्ह्यात विदारक स्थिती दिसली. रायगड जिल्ह्यातील यंत्रणेकडून एक महिन्यात हे काम पूर्ण होऊ शकत नव्हते. त्यामुळे, आसपासच्या जिल्ह्यांतील महावितरणची यंत्रणा व मजुरांचे मनुष्यबळ कामाला लावले. येत्या दहा दिवसांत रायगड जिल्ह्यातील वीज वितरण सुरळीत होईल, अशी ग्वाही ऊर्जा, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. 

ते म्हणाले, ""कोरोनाच्या संकटात चक्रीवादळाच्या मोठ्या संकटाने भर घातली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत रायगड जिल्ह्यातील प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दौऱ्यातही रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. आढावा बैठका घेतल्या. आपत्ती व्यवस्थापन व महावितरणच्या यंत्रणेला वेग दिला. श्रीवर्धन तालुक्‍यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. तेथे एकाच वीज उपकेंद्रांतर्गत 300 खांब पडले आहेत.'' 

कोरोनामुळे परप्रांतीय मजूर घरी गेल्याने अडचणी आल्या; परंतु रायगडच्या यंत्रणेसमवेत आसपासच्या जिल्ह्यांतील महावितरणचे 60 अभियंते व 600 मजूर दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. महिनाभराचे काम 10 दिवसांत पूर्ण करून, वीज वितरण सुरळीत करण्याचा अटोकाट प्रयत्न आहे, असे तनपुरे म्हणाले. 

नगर जिल्ह्यातील राहुरी, संगमनेर व अकोले तालुक्‍यांना चक्रीवादळाचा तडाखा बसला. महावितरणच्या श्रीरामपूर विभागात उच्चदाब वाहिनीचे 70 व लघुदाब वाहिनीचे 170 खांब पडले. उच्चदाब वाहिनीचे सर्व खांब उभे केले आहेत. लघुदाब वाहिनीचे खांब उभे करण्याचे काम अपूर्ण आहे. येत्या दोन दिवसांत ते पूर्ण होईल. शासनाने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा कामाला लावली आहे, असे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com