esakal | तीन वेळा बदलूनही रोहित्र निघाले बंद; वीस दिवसांपासून गाव अंधारात
sakal

बोलून बातमी शोधा

Power supply cut off at Mangrul Budruk in Shevgaon taluka

वीजेचे रोहीत्र जळाल्याने तालुक्‍यातील मंगरुळ बुद्रुक येथील वीज पुरवठा १५-२० दिवसांपासून खंडीत झाला आहे.

तीन वेळा बदलूनही रोहित्र निघाले बंद; वीस दिवसांपासून गाव अंधारात

sakal_logo
By
सचिन सातपुते

शेवगाव (अहमदनगर) : वीजेचे रोहीत्र जळाल्याने तालुक्‍यातील मंगरुळ बुद्रुक येथील वीज पुरवठा १५-२० दिवसांपासून खंडीत झाला आहे. महावितरणने याबाबत गलथानपणाचा कळस करत तीन वेळा बदलून आणलेले रोहीत्र बंद निघाल्याने ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. 

मंगरुळ बुद्रुक (ता. शेवगाव) येथे चापडगाव येथील महावितरणच्या 33 के. व्ही. उपकेंद्रातून विद्युत पुरवठा करण्यात येतो. गावठाणला वीज पुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेले सिंगल फ्युज योजनेचे रोहीत्र 20 दिवसांपूर्वी जळाले आहे. त्यामुळे गावचा वीज पुरवठा पुर्णपणे खंडीत झाला आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना अनेक अचणींचा सामना करावा लागत आहे.

महावितरणने यावर गलथानपणाचा कळस करत अधिकृत नेमलेल्या खासगी संस्थेकडून तीनदा नगर येथून बदलून आणलेले रोहीत्र बंद असल्याने ते पुन्हा काढून नेण्यात आले. मात्र अद्यापही सुस्थितीतील रोहीत्र न मिळाल्याने नागरीकांना दैनंदिन गरजांसाठी शेजारच्या गावांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातच सध्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर थाडसी चोऱ्यांचे सत्र सुरु आहे. 

महावितरणने त्वरीत दखल घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरपंच गणेश विघ्ने, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब विघ्ने, अर्जुन झिरपे, बबन झिरपे, दत्तात्रेय केदार, चंद्रकांत केदार, राजेंद्र विघ्ने, रामकिसन फुंदे यांनी दिला. 

मंगरुळ येथील गावठाण योजनेसाठी एजन्सीकडून आणलेल्या रोहीत्राबदल वरीष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच संबंधीत एजन्सीलाही संपर्क केला असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 
- एस. एन. पवार, सहाय्यक अभियंता, महावितरण चापडगाव 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image