
संगमनेर : अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी व्यवस्थापन अभ्यास महाविद्यालयातील विद्यार्थी प्रज्ज्वल दीपक साळुंखे याची सेंट किटस ॲण्ड नेव्हिस या कॅरिबियन बेटावर असलेल्या आंतरराष्ट्रीय कंपनीत वार्षिक १५ लाख रुपयांच्या पगारावर नोकरीसाठी निवड झाली. प्रज्ज्वलने आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसह नेतृत्व गुण, संवादकौशल्य आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर ही सुवर्णसंधी मिळवली.