
राहुरी: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहण्याचा माझा निर्णय आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माझ्यावर पहिल्यांदा आमदार असताना राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपविली. त्यांच्या आशीर्वादाने तालुक्यात ऊर्जाविषयक पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण केले. निळवंडे धरणाचे पाणी आणले, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात राहण्याचा माझा निर्णय आहे, असे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.