शिर्डीतील प्रसादालय उद्यापासून होणार सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prasadalaya in Shirdi closed

शिर्डीतील प्रसादालय उद्यापासून होणार सुरू

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

शिर्डी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डीतील बंद असलेले प्रसादालय उद्यापासून भाविकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून यासाठी परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शिर्डीत दर्शनासाठी जाणाऱ्या साईभक्तांना प्रसादालयात भोजन करता येणार आहे.

कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आल्यानंतर राज्य शासनाकडून अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्याचात एक भाग म्हणून ऑक्टोबर महिन्यापासून भाविकांसाठी राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली होती. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून शिर्डीतील प्रसादालय भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. यामुळे शहरात दर्शनासाठी राज्यातून आणि परराज्यातून येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

हेही वाचा: साईंचे दर्शन रात्री नऊपर्यंतच! शिर्डी संस्थानाकडून दर्शन, आरती व्यवस्थेत बदल

प्रसादालय बंद असल्याकारणाने भाविकांना जादा पैसे मोजून हॉटेलमध्ये जेवण करावे लागत होते. मात्र, प्रशासनाच्या या निर्णयामुळे भाविकांची होणारी परवड थांबणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

loading image
go to top