नगर जिल्हा पेन्शनर्स संघटनेच्या अध्यक्षपदी प्रताप देवरे 

गौरव साळुंके
Sunday, 15 November 2020

जिल्हा पेन्शनर्स संघटनेच्या नगरपालिका शिक्षक व शिक्षकेतर विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी येथील पालिकेचे मुख्याध्यापक प्रताप देवरे यांची, तर शहराध्यक्षपदी मुख्याध्यापक प्रकाश माने यांची एकमताने निवड झाली आहे.

श्रीरामपूर (अहमदनगर) : जिल्हा पेन्शनर्स संघटनेच्या नगरपालिका शिक्षक व शिक्षकेतर विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी येथील पालिकेचे मुख्याध्यापक प्रताप देवरे यांची, तर शहराध्यक्षपदी मुख्याध्यापक प्रकाश माने यांची एकमताने निवड झाली आहे. 

संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. कार्यकारिणी अशी : जिल्हाध्यक्ष प्रताप देवरे, कार्याध्यक्ष नूरमोहंमद पठाण, सरचिटणीस विलास निकम, उपाध्यक्ष प्रकाश जमधडे, घनश्‍याम एडके, कोषाध्यक्ष धोंडिराम गायकवाड, सहचिटणीस एकनाथ वाघ. शहर कार्यकारिणीत अध्यक्षपदी प्रकाश माने, कार्याध्यक्षपदी रामभाऊ उगले, सरचिटणीसपदी शब्बीर शेख, उपाध्यक्षपदी श्रीपाद काळवीट, सुनंदा माळवे, अशोक कानडे यांची निवड झाली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pratap Deore as the President of Nagar District Pensioners Association