
राहाता : वारी पंढरीची अन् ज्ञानगंगा प्रवरेची हे घोषवाक्य केंद्रस्थानी ठेवून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुस्मिता विखे पाटील यांनी आषाढीनिमित्त अश्वरिंगण सोहळ्याचे आयोजन केले. वारकऱ्यांची वेशभूषा करून टाळ, मृदंगाच्या गजरात संस्थेच्या १५ हजार विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला.