Primary Teachers Union : गुरुजींच्या बदली धोरणात बदल: प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीला यश; मंत्र्यांबरोबर बैठक
Ahilyanagar News : समानीकरण करून विस्थापितांचा सातवा राऊंड घेण्यात यावा, ही आग्रही मागणी या बैठकीत राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी केली होती. या सर्व दुरुस्त्या बदली धोरणात करण्यात आलेल्या आहेत.
"Primary Teachers' Union members meet with ministers to discuss and secure changes in the teacher transfer policy."Sakal
अहिल्यानगर : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या बदली धोरणात अंशतः बदल करण्यात आला आहे. शिक्षकांची अनेक दिवसांपासून या बदलीधोरणात बदलाची मागणी होती. ती शिक्षक संघाच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाली आहे.