esakal | नागेश्वराचा यात्रोत्सव रद्द झाल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट
sakal

बोलून बातमी शोधा

The procession of village god Nageshwar Maharaj at Bhalvani has been canceled on the occasion of Mahashivaratri

मंदिरात प्रवेशव्दारावर रथावर नागेश्वर महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली. तुरळक बाहेरगावावरून आलेले भाविक व ग्रामस्थ यांना प्रवेशव्दारावर दर्शन घेवून समाधान मानावे लागले.

नागेश्वराचा यात्रोत्सव रद्द झाल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाळवणी (अहमदनगर) :  नगर जिल्ह्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या भाळवणी येथील ग्रामदैवत नागेश्वर महाराजांचा महाशिवरात्रीनिमित्त साजरा होणारा वार्षिक यात्रोत्सव यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ व यात्रा कमिटी यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यात प्रशासनानेही मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आदेश दिले. एरव्ही महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र ग्रामस्थांनी मंदिर परिसरात जाणारे सर्व मार्ग बंद केले होते. मंदिरात प्रवेशव्दारावर रथावर नागेश्वर महाराजांची मूर्ती ठेवण्यात आली. तुरळक बाहेरगावावरून आलेले भाविक व ग्रामस्थ यांना प्रवेशव्दारावर दर्शन घेवून समाधान मानावे लागले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
उत्सवाची परंपरा खंडीत होवू नये, म्हणून पहाटे सरपंच लिलाबाई रोहोकले, उपसरपंच संदीप ठुबे व पुजारी राजेंद्र पवार व अश्विनी पवार यांच्या उपस्थितीत महापूजा व अभिषेक करण्यात आला. यात्रोत्सव निमित्त छबीना, शेरणी वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम, किर्तन आदी कार्यक्रम रद्द केले होते. उद्या शुक्रवार(ता.12) रोजी भरणारा कुस्त्याचा आखाडाही रद्द करण्यात आला असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली.