प्राध्यापकाकडून औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थीनीचा विनयभंग

आनंद गायकवाड
Friday, 16 October 2020

औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील प्रा. आरशू पिरमोहम्मद पटेल (रा. हसनापूर, तालुका राहता) याने 21 वर्षाच्या विद्यार्थिनीशी तिला लज्जा उत्पन्न होईल, असे चाळे करून तिचा विनयभंग केला.

संगमनेर (अहमदनगर) : शहरातील औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील प्रा. आरशू पिरमोहम्मद पटेल (रा. हसनापूर, तालुका राहता) याने 21 वर्षाच्या विद्यार्थिनीशी तिला लज्जा उत्पन्न होईल असे चाळे करून तिचा विनयभंग केला. या आरोपावरून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी प्रा. आरषू पटेल, याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता, रविवारपर्यंत (ता. 17) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश मिळाला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी, शहरातील फार्मसी महाविद्यालयात बीड जिल्ह्यातून आलेल्या पिडीत युवतीला मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यापासून लगट करीत त्रास देण्यास सुरवात केली होती. तसेच विद्यार्थिनीचा मोबाईल क्रमांक घेवून त्याने त्यावरही अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. तरुणी त्यांच्या रोजच्या जाचाला वैतागली आणि तिने अखेर पोलिस ठाणे गाठले.

पोलिस उपअधीक्षक रोशन पंडीत यांनी संबंधित तरुणीला विश्वासात घेवून तिच्याकडून वास्तव माहिती घेतल्यानंतर, जलद कारवाई करीत संशयित आरोपी प्रा. आरषू पीरमोहंमद पटेल याला ताब्यात घेतले व संबंधित तरुणीच्या फिर्यादीवरुन त्याच्यावर गुन्हा नोंद करुन तात्काळ अटक केली आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A professor molested a young man in the College of Pharmacology