सावित्रीबाईंमुळे सर्वच क्षेत्रात प्रगती - आमदार जगताप

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

सावित्रीबाई फुले यांची जयंती राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

नगर ः सावित्रीबाई फुले यांनी महिलांना खऱ्या अर्थाने जगण्याची दिशा दिली. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला. त्यामुळेच आज महिला उच्च शिक्षण घेऊन सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती करत आहेत, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 

सावित्रीबाई फुले यांची जयंती राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सुरेश बनसोडे, अंजली आव्हाड, संतोष ढाकणे, संजय सपकाळ, अमित खामकर आदी उपस्थित होते. 

यांचा झाला सन्मान 
डॉ. ए. ए. देशमुख, डॉ. पी. एस. जगताप, डॉ. एम. व्ही. देशमुख, डॉ. पी. एस. नलगे, डॉ. व्ही. के. वाघे, डॉ. यू. एस. पाटील, डॉ. आर. व्ही. म्हसे, डॉ. ए. पी. पवार, दामोदर विधाते, शोभा गिते, सविता सोनवणे, शोभा गाडगे, लता म्हस्के, सारिका गायकवाड. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Progress in all fields due to Savitribai