सकारात्मकतेला प्राधान्य दिल्यास संस्थेची प्रगती : घुले

सचिन सातपुते
Sunday, 22 November 2020

सहकारी संस्था चालविणे दिवसेंदिवस अधिक जिकिरीचे होत चालले आहे. नकारात्मक बाबी दूर सारून सकारात्मक गोष्टींना प्राधान्य दिले.

शेवगाव (अहमदनगर) : सहकारी संस्था चालविणे दिवसेंदिवस अधिक जिकिरीचे होत चालले आहे. नकारात्मक बाबी दूर सारून सकारात्मक गोष्टींना प्राधान्य दिले, तर संस्थेचा वटवृक्ष उभा राहतो. माध्यमिक पतसंस्थेने याच तत्त्वावर काम करीत सभासदांची आर्थिक पत वाढविली, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले यांनी केले. 

शेवगाव येथे माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या नवीन इमारतीचे उद्‌घाटन घुले यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ऍड. शिवाजी काकडे, ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे, रविराज गडाख, अरुण लांडे, बबन पवार, बबन भुसारी, अंबादास कळमकर, राजाजी बुधवंत, भाऊसाहेब चेके, डॉ. विकास बेडके, अप्पासाहेब शिंदे उपस्थित होते. नावीन्यपूर्ण अनेक उपक्रम राबवीत संस्थेने शंभर टक्के वसुली करून, राष्ट्रीयीकृत बॅंकेलाही हेवा वाटेल अशा ठेवी निर्माण केल्याचे घुले म्हणाले. पतसंस्थेचे अध्यक्ष काकासाहेब घुले यांनी प्रास्ताविक, तर नीलेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सत्यवान थोरे यांनी आभार मानले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Progress of the organization if priority is given to positivity