farmer id
sakal
पारनेर - अॅग्रीस्टॅक योजनेंतर्गत प्राप्त फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करणे व त्याचे वितरण करणे अनधिकृत असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) चालकांनी अशा प्रकारची कार्यवाही तात्काळ थांबवावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.