कोरोनाचा प्रादुर्भाव परत वाढल्याने प्रकल्प पर्यटकांसाठी बंद

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 February 2021

कोरोना परत आपल्या राज्यात वाढतोय. म्हणून हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प, आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी पुढील काही महिने बंद करावे लागत आहेत.

अहमदनगर : बाबांना (डॉ.प्रकाश आमटे) गेले सात दिवस ताप खोकला होता. दोन दिवसांपूर्वी कोरोना टेस्ट केली. RTPCR निगेटिव्ह आली. पण ताप खोकला औषध घेऊन सुद्धा कमी होत नव्हता. म्हणून चंद्रपूरला चेक अप केला. डॉ.दिगंत आणि आई सोबत होते. सीटी स्कॅन आणि इतर ब्लड टेस्ट चेक अपमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

तज्ञ डॉक्टरांनी नागपुरात ऍडमिट व्हायचा सल्ला दिला आहे. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी. कोरोना परत आपल्या राज्यात वाढतोय. म्हणून हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प, आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी पुढील काही महिने बंद करावे लागत आहेत. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. स्वतःची व इतरांची कोरोना संदर्भातील नियम पाळून काळजी घ्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The project has been closed to tourists due to increased incidence of corona