esakal | कोपरगावात ८ मेपर्यंत जनता कर्फ्यू

बोलून बातमी शोधा

public curfew
कोपरगावात ८ मेपर्यंत जनता कर्फ्यू
sakal_logo
By
मनोज जोशी

कोपरगाव : तालुक्‍यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. मृत्यूदर वाढल्याने 30 एप्रिल ते 8 मेदरम्यान कडक "जनता कर्फ्यू' लागू करण्यात येणार आहे. या दिवसांत केवळ रुग्णालये आणि सकाळी सात ते 11 या वेळेत दूध व पाण्याच्या जारची विक्री सुरू राहील.

किराणा, फळेविक्री व इतर आस्थापना पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील, असा निर्णय आज सर्वपक्षीय कोरोना नियंत्रण समितीतर्फे घेण्यात आला. या "जनता कर्फ्यू'मुळे कोरोना संसर्ग आटोक्‍यात येण्यास निश्‍चित मदत होणार आहे, असे नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे व सर्व नगरसेवकांनी सांगितले.

पालिका सभागृहात कोरोना नियंत्रण समितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. कोपरगाव शहर व तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हॉस्पिटल बेड, ऑक्‍सिजन, इंजेक्‍शन या बाबी रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध होत आहेत. परिणामी, मृत्यूदर वाढत आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. 30) रात्री आठपासून शनिवारी (8 मे) सकाळी सातपर्यंत "जनता कर्फ्यू' राहणार आहे.