
अहिल्यानगर : पुणे पोलिस दलात दहा वर्षे नोकरी करत दमदार कामगिरी करणारा ‘तेजा’ नुकताच सेवानिवृत्त झाला आहे. ‘जी २०’ परिषदेमधील सुरक्षा, पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या दौऱ्याची सुरक्षा, तसेच इतर ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारा तेजा पुणे पोलिस दलात बॉम्ब शोधक पथकातील (बीडीडीएस) कर्मचारी होता. त्याने अनेकदा महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. सेवानिवृत्तीनंतर तो अहिल्यानगर तालुक्यातील मनगाव येथील माउली परिवारात सामील झाला आहे.