
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित पुणे ते अहिल्यानगर रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणास रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे. तसेच साईनगर (शिर्डी) ते पुणतांबा आणि साईनगर (शिर्डी) ते नाशिक या थेट या मार्गासाठी ही मंजुरी दिली आहे.