esakal | कोरोना प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणची देवस्थाने खुली करण्याची पुरोहित संघाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Purohit Sangh demand to open the temple

राज्यामध्ये अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, काही ठिकाणी नगण्य प्रमाणात उरला आहे.

कोरोना प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणची देवस्थाने खुली करण्याची पुरोहित संघाची मागणी

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : राज्यामध्ये अनेक ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, काही ठिकाणी नगण्य प्रमाणात उरला आहे. अशा ठिकाणची देवस्थाने भाविकांसाठी खुली करण्याची मागणी, संगमनेरातील पुरोहित संघाच्यावतीने करण्यात आली आहे. या बाबत संघेने प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, राज्यात अनलॉकच्या पार्श्वभुमिवर शाळा व देवस्थाने वगळता जवळपास सर्व अस्थापना व कार्यालये आदीं नियमांच्या अधिन राहून सुरु झाले आहेत. तसेच इतरही सार्वजनिक क्षेत्रे जनतेसाठी खुली झाली आहेत. मात्र देवालये उघडण्यासाठी अद्यापही हिरवा कंदील न मिळाल्याने भाविकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. समाजाच्या हितासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या संगमनेर पुरोहित संघाने संगमनेर परिसरात त्यांची भूमिका प्रामाणिकपणे बजावली आहे. त्यामुळे विशेष सावधगिरी बाळगण्याबाबत संघ शंभर टक्के सतर्क आहे. कोरोना काळात नियमांचे पालन करण्याचे आवाहन करीत पुरोहित संघाने जनजागृती केली आहे. 

राज्य शासन व विविध समाज समर्पित व्यक्ती, संस्था व संघटना यांनी कोरोनाशी लढण्यासाठी अपार परिश्रम घेतले. त्याचा परिणाम म्हणून राज्यातील बहुतांश ठिकाणी जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशा वेळी धार्मिक भावनांशी निगडीत असलेली देवालये खुली केल्यास, कोवीडच्या नियमांचे व योग्य अंतर, सॅनिटायझर व मास्कचा वापर या त्रिसूत्रीचे पालन करतील अशी ग्वाही दिली आहे. या रास्त व न्याय मागणीचा गांभिर्याने विचार करुन देवालये उघडण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यावेळी पुरोहीत संघाचे अध्यक्ष भाऊ जाखडी तसेच सदस्य उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image