esakal | आता जनावरांनाही आधार कार्ड, नेवाशातील सव्वा लाख पशुधनाला मिळणार ओळख
sakal

बोलून बातमी शोधा

A quarter of a million animals in Nevasa will be identified

या साठी तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातील गाव, वस्ती याठिकाणी असलेल्या गाय, बैल, म्हशी या जनावरांना टॅगिंग करण्याची मोहीम सुरु आहे.

आता जनावरांनाही आधार कार्ड, नेवाशातील सव्वा लाख पशुधनाला मिळणार ओळख

sakal_logo
By
सुनील गर्जे

नेवासे  : जनावरांना स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, यासाठी केंद्र सरकारकडून जनावरांची नोंदणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जनावरांच्या कानामध्ये आधार टॅगिंग करण्याचे काम पशुसंवर्धन विभागाने सुरु केले आहे. यामध्ये नेवासे तालुक्यातील एकूण १ लाख ३२  हजार १३२ गाय, बैल, म्हैस या जनावरांपैकी   १ लाख १८  हजार ९०० जनावरांना स्वतंत्र आधार क्रमांक मिळणार आहे. आतापर्यंत ६ हजार  ७६८ जनावरांचा संपूर्ण डाटा शासनाकडे या माध्यमातून संकलित झाला आहे.

राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत गाय, बैल, म्हैस यांना लाळ, खुरकत रोग प्रतिबंधक लसीकरण व टॅंगिंग करण्याचे काम तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे. या माध्यमातून जनावरांची परिपूर्ण माहिती इंटरनेटवर उपलब्ध होणार आहे.

या साठी तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातील गाव, वस्ती याठिकाणी असलेल्या गाय, बैल, म्हशी या जनावरांना टॅगिंग करण्याची मोहीम सुरु आहे. हे काम सध्या पशुसंवर्धन विभागाकडून आघाडीवर सरू आहे.

पशु रोग नियंत्रन  शासनाच्या 'ई-नाफ' या पोर्टलवर ही सर्व माहिती संकलित केली जात आहे. (ता. १६) नोव्हेंबर अखेर नेवासे तालुक्यातील १ लाख २ हजार ६४९  जनावरांना टॅगिंग लावण्यात आले आहे.  तालुक्यात गाय, बैल १ लाख ७ हजार ५८५  तर म्हशींची संख्या २४ हजार ५४७ एवढी आहे.

शासनाकडून जनावरांसाठी विविध योजना राबविण्यात येतातः परंत, या अगोदर याबाबत अद्यावत माहिती शासनाकडे नसल्यामुळे यापासून अनेक पशुधन मालक वंचित राहत होते. आता स्वतंत्र क्रमांकामुळे शासनाकडून लागू करण्यात आलेली योजना थेट त्या जनावरापर्यंत पोहोचणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात काही नुकसान झाल्यास ती मदत जनावर मालकास मिळवून देण्यास आता सोपे होणार आहे.

वेळेत उपचार शक्य होणार.!

जनावरांचे वय, वर्ण, जात, शींग, शेपूट, लसीकरण, रेतन, पूर्वीचे आजार याची नोंद देखील या माध्यमातून होणार आहे. तर खरेदी-
विक्रीचे व्यवहार करताना प्रत्येकवेळी जवळच्या शासकीय पशुर्वेद्यकीय रुग्णालयात जनावरांचा मालकी हक्क दाखविण्यासाठी याच क्रमांकाचा उपयोग होणार आहे. या माध्यमातून कोणत्याही राज्यात जनावर गेल्यास कुठल्याही प्रकारचे आजार निर्माण झाल्यास आधार कार्डमुळे
आजाराचे निदान होऊन वेळेत उपचार करणे शक्य होणार आहे. 

नेवासे पशुधन आधार टॅगिंग दृष्टीक्षेपात

एकूण पशुधन : १३२१३२
गाय, बैल वर्गीय : १०७५८५
म्हैस वर्गीय : २४५४७
आधार टॅगिंग : ११८९००

जनावरांचे वय, लसीकरण करण्याचे कम तालुक्यात सुरु आहे. तसेच टॅगिंग करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे. माणसाप्रमाणे जनावरांनाही ओळखपत्र आता मिळणार आहे.
पशुधन मालकांनी चार महिन्यापासून पुढे वय असणाऱ्या गाय, बैल, म्हशी यांना स्वतंत्र क्रमांक मिळवून द्यावा. 

-डॉ. दिनेश पंडुरे, पशुधन विस्तार अधिकारी, पंचायत समिती, नेवासे, अहमदनगर.

loading image
go to top