
शिर्डी : जिल्ह्यात विविध सरकारी समित्यांवर भाजप महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी नेमण्याचा निर्णय झाला आहे. तालुका आणि जिल्हा पातळीवरील या नियुक्त्या केल्या जातील. सौर ऊर्जा निर्मिती केंद्र सुरू करण्यात अहिल्यानगर जिल्हा आघाडी घेईल. जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्टर जमीन त्यासाठी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.