
शिर्डी : महाराष्ट्रात पाण्याचे नियोजन व व्यवस्थापन सुधारण्यासाठी नवीन पद्धतींचा वापर व नवनवीन धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे, विक्रम काळे यांनी शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला जलमापक यंत्रे बसविण्यासंदर्भात लक्ष्यवेधी सूचना मांडली होती.