

Radha Sonawane sells Diwali products in Sangamner to support her three children's future after losing her husband.
esakal
राजू नरवडे:
संगमनेर : , एक वर्षापासून आजाराशी झुंज देणाऱ्या पतीचे निधन. उपचारांसाठी केलेला लाखोंचा खर्च.. उसने-पासने घेतलेले पैसे..पतीच्या निधनानंतर अवघ्या पाच दिवसांपूर्वीच पार पडलेला दशक्रिया विधी...डोळ्यांसमोर उभे असलेली दोन मुले आणि एका मुलीचे भविष्य...अशा संकटांनी आयुष्याला घेरले असतानाही एका आईने हार मानली नाही. पतीच्या निधनानंतर डोळ्यांतील अश्रू पुसत ती पुन्हा कामाला लागली.