मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दबावाखली काम करत आहेत... कोणताच निर्णय स्वत:चा नाही

आनंद गायकवाड
Saturday, 25 July 2020

राज्याचे मुख्यमंत्री दबावाखाली काम करीत आहेत. कोणताही निर्णय स्वतः घेत नाहीत. तीन पक्षाच्या सरकारमध्ये संशयकल्लोळ सरु असल्याचे सांगत, या सरकारचा रिमोट दुसऱ्याच्या हाती असल्याची घणाघाती टीका माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 

संगमनेर (अहमदनगर) : राज्याचे मुख्यमंत्री दबावाखाली काम करीत आहेत. कोणताही निर्णय स्वतः घेत नाहीत. तीन पक्षाच्या सरकारमध्ये संशयकल्लोळ सरु असल्याचे सांगत, या सरकारचा रिमोट दुसऱ्याच्या हाती असल्याची घणाघाती टीका माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 
संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या निवासस्थानी दिलेल्या सदिच्छा भेटीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सरकारमध्ये कोणताही समन्वय नसल्याने अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याकडे लक्ष वेधून ते म्हणाले, सरकारमधील मंत्री आपले अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवित आहेत.

कोरोना संकटातही राज्य सरकारकडून योग्य निर्णय प्रक्रियेची अंमलबजावणी होवू शकली नाही असा आरोप करून, या सरकारचे अपयश कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून दिसून येत असून, यामुळे देशात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर दिसतो हे चिंताजनक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्रीच स्वतः च्या अखत्यारित निर्णय घेवू शकत नाहीत, सरकारवर त्यांचा कंट्रोल नाही आणि रिमोटही दुसऱ्याच्या हातात गेल्याची टीका त्यांनी केली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhakrishna Vikhe Patil Criticism of Chief Minister Uddhav Thackeray