
अहिल्यानगर : कुकडी व घोड प्रकल्पातून सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह दोन्ही प्रकल्पांतून चार आवर्तने शेतीसाठी देण्याचा निर्णय आज कुकडी आणि घोड संयुक्त प्रकल्प कालवा सल्लागार समिती बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.