esakal | राहुल गांधींच्या अटकप्रकरणी राहुरीत काँग्रेसतर्फे रस्ता रोको आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi arrest case the Rahuri Congress blocked the road

हाथरस येथे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करून, त्यांच्यासह प्रियंका गांधी यांना अटक केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिस व सरकारचा निषेध करण्यात आला.

राहुल गांधींच्या अटकप्रकरणी राहुरीत काँग्रेसतर्फे रस्ता रोको आंदोलन

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी (अहमदनगर) : हाथरस येथे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करून, त्यांच्यासह प्रियंका गांधी यांना अटक केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिस व सरकारचा निषेध करण्यात आला. याबरोबर केंद्र सरकारने आणलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात राहुरी येथे काँग्रेस पक्षातर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

आज सकाळी अकरा वाजता राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करून, नगर-मनमाड महामार्गावर दहा मिनिटे रस्ता रोको केला. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, संजय पोटे, राजेंद्र बोरुडे, बाबासाहेब धोंडे, पंढरीनाथ पवार, नानासाहेब कदम, शशिकांत गाडे, संजय करपे, संजय विधाटे, बबन ढोकणे, अशोक गुंजाळ, अजित तारडे व इतरांनी आंदोलनात भाग घेतला. तहसीलदार फसियोद्दीन शेख व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

संपादन : अशोक मुरुमकर