देशाला पुढे नेण्यासाठी राहुल गांधी यांनीच काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारावे

आनंद गायकवाड
Sunday, 23 August 2020

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीच पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले पाहीजे, असे मत राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

संगमनेर (अहमदनगर) : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीच पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारले पाहीजे, असे मत राज्याचे महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. संगमनेरात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.

ते म्हणाले, या देशाला पुरोगामी, समर्थ व देशाला पुढे घेवून जाणारे नेतृत्व म्हणून खासदार राहुल गांधी यांची गरज आहे. यासाठी त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारण्याची आवश्यकता आहे. ही केवळ काँग्रेस पक्षाची नाही तर देशाची गरज आहे. कारण असे नेतृत्व केवळ राहुल गांधीच देऊ शकतात. सोनिया गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात पक्षासाठी खुप मोठे आणी चांगले काम केले आहे. एक समर्थ नेतृत्व त्यांनी दिले आहे.

त्यांना हवे तो पर्यंत त्या पक्षाच्या अध्यक्ष म्हणून राहू शकतात. मात्र त्यानंतर नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी यांनी तयार राहीले पाहीजे आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कम उभे आहोत अशी ग्वाही थोरात यांनी दिली.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi should accept the leadership of the Congress to take the country forward