
राहुरी : महावितरणच्या वाढलेल्या वीज दरामुळे घरगुती वीज ग्राहकांना दर महिन्याच्या येणाऱ्या बिलासाठी मोठी रक्कम बाजूला ठेवावी लागत आहे. त्यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक बजेट बिघडत चालले आहे. वीज बिलात वसूल करण्यात येणारे १६ टक्के वीज शुल्क थेट राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होत आहे. वाढलेल्या भरमसाट वीज बिलात सरकारकडून दिलासा मिळत नसल्याने सामान्य घरगुती ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.