राहुरी : बसस्थानकासाठी निविदा प्रक्रिया करावी

जुन्या इमारतीचे निर्लेखन होणार; पाच कोटी रुपयांची तरतूद
 bus stand
bus standsakal

राहुरी : राहुरीच्या अद्ययावत बसस्थानक इमारतीच्या बांधकामासाठी १७ कोटी २५ लाखांच्या अंदाजपत्रकीय खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात पाच कोटींची तरतूद केली. महिनाभरात निविदा प्रक्रिया, ठेकेदार एजन्सीची निवड करून प्रत्यक्ष कामास सुरूवात करावी, अशी मागणी ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी राज्य परिवहन महामंडळाचे कार्यकारी संचालक शेखर चन्ने यांच्याकडे केली.

आज (शनिवारी) तनपुरे यांनी भ्रमणध्वनीवरून चन्ने यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तनपुरे म्हणाले, की नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर राहुरी बसस्थानक आहे. शिर्डी व शिंगणापूर देवस्थानांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने भाविकांची मोठी गर्दी असते. कर्नाटक, मध्यप्रदेशातून येणाऱ्या बसेसही या स्थानकात थांबतात. दिवसभरात ५२५ बसेस मधून तीन हजार प्रवासी बसस्थानकावरून प्रवास करतात. राहुरी बसस्थानकाची इमारत ५० वर्षांपूर्वीची जुनी, जीर्ण झालेली आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळला. इमारतीला ठिकठिकाणी भेगाही पडल्या आहेत.

चालक-वाहकांचे विश्रांतीगृह, नियंत्रण कक्षाच्या भिंती, छताला तडे गेल्याने जीव मुठीत धरून वावरावे लागते. बसस्थानकाची दुरवस्था झाल्याने नवीन अद्ययावत इमारतीची गरज होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जानेवारी २०१९ मध्ये प्रश्न मार्गी लावण्यासाठी साकडे घातले.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर मर्यादा आल्याने, निधीला विलंब झाला. परंतु, उपमुख्यमंत्री पवार यांनी दिलेला शब्द पाळला. अर्थसंकल्पात प्रशासकीय मंजुरीसह निधीची तरतूद केली. परंतु, निविदा प्रक्रियेला विलंब होत असल्याने बसस्थानकाचे काम रखडले.

जागेवर अतिक्रमण..!

राहुरीच्या बस आगारासाठी १९६३ साली बालाजी मंदिर देवस्थान ट्रस्टची ३६ गुंठे जमीन संपादित करण्यात आली. त्याची सद्यस्थितीत किंमत चार कोटी आहे. मागील ५९ वर्षात आगार झाले नाही. या जमिनीवर बाभळीची व इतर झाडेझुडुपे आहेत. अतिक्रमणे झाली आहेत. त्याकडे महामंडळाचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे मंदिर परिसराचे सौंदर्य नष्ट झाले. आगारासाठी तांत्रिकदृष्ट्या जमीन अपुरी आहे. जमीन हस्तांतरित करून, राहुरी पालिकेच्या ताब्यात द्यावी. तेथे उद्यान उभारुन, मंदिराची शोभा वाढविता येईल. दर्शनानंतर भाविकांना उद्यानात बसण्याची सोय होईल, असेही तनपुरे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com