
-विलास कुलकर्णी
राहुरी : राहुरीचे ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानक आता नावापुरते राहिले आहे. कोरोना महामारीपूर्वी पाच रेल्वेंना अप-डाऊन अशा दहा फेऱ्यांना या स्थानकात थांबा होता. कोरोनानंतर अवघ्या एका रेल्वेगाडीला अप-डाऊन अशा दोन फेऱ्यांचा थांबा राहिला आहे. या स्थानकातून आरक्षित तिकीट विक्री सुद्धा बंद झाली आहे. राहुरी रेल्वे स्थानकाची लाखो रुपये खर्चाची नवीन वास्तू प्रवाशांच्या वर्दळीअभावी शोभेची वस्तू झाली आहे.