
राहुरी : नात्यातील अकरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. राहुरी पोलिसांनी सोमवारी पहाटे आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. आरोपीने रविवारी (ता. १) सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गावातून अंडी घेऊन देतो, असे सांगून घराच्या बाहेर नेले. मुलीला चापटीने मारहाण करून तिच्याबरोबर जबरदस्तीने अत्याचार केला.