
-विलास कुलकर्णी
राहुरी : चहाची टपरी असो वा विवाह समारंभ, कुठे ना कुठे आपल्याला प्लास्टिक किंवा कागदी डिस्पोजल ग्लास/कप मध्ये गरम चहा, कॉफी, दूध, पाणी पिण्याची वेळ येते. या डिस्पोजल मधून गरम पदार्थ पिणे अनेक गंभीर आजारांना निमंत्रण ठरू शकते. असे आरोग्याला घातक, जीवघेण्या डिस्पोजलवर बंदी घालण्याची गरज निर्माण झाली आहे.