
जामखेड : विशेष पोलिस पथकाने एक लाख २० हजार रुपये किमतीच्या देशी-विदेशी अवैध दारू बाळगणाऱ्या हॉटेलवर कारवाई करत तीन आरोपींना जेरबंद केले. परीविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी जामखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पोलिस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना बुधवारी (ता.१८) जामखेडमधील हॉटेल पाटीलवाडा व हॉटेल साई लॉजिंगवर छापा टाकला.