
अहिल्यानगर : पिकअप चोरी, दुचाकी चोरी तसेच रेल्वेची कॉपर वायर चोरणाऱ्या व गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी बोल्हेगावच्या गांधीनगर परिसरात जेरबंद केले. त्यांच्याकडून एक लाख ४५ हजार रुपये किमतीच्या तीन चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.