मुसळधार पावसाने हाती आलेल्या वाटाणा पिकाचे नुकसान 

सनी सोनावळे
Saturday, 25 July 2020

कान्हुर पठार (ता.पारनेर) येथे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे कामे झाली होती गेली दोन दिवस मुसळधार पावसाने सर्व तळे,ओढे तुडुंब भरली आहेत मात्र हाती आलेल्या वाटाणा पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : कान्हुर पठार (ता.पारनेर) येथे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे कामे झाली होती गेली दोन दिवस मुसळधार पावसाने सर्व तळे,ओढे तुडुंब भरली आहेत मात्र हाती आलेल्या वाटाणा पिकाचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

गावामध्ये कान्हुर जलक्रांती अभियान व कान्हुर पाणी फाऊंडेशन मार्फत सोशल नेटवर्किंग साईटवर केलेल्या आवाहनानुसार लोकवर्गणीतून गावातील बाजार तळे,बेडकीचे तळे,कापसे तलाव,लेंडी चे तळे,जंजळ तलाव,संगम ओढ्याचे रूंदीकरण यासंह अन्य जलसंधारणाचे कामे या दोन समुहातील तरूणांनी केली होती याकरीता गावातील व कामानिमित्त बाहेरगावी व देशाबाहेरील भुमीपुत्रांनी लाखो रूपयांची देणगी दिली होती कामेही झाली आणि निसर्गाने देखील साथ देत गेली दहा वर्षे येवढा पाऊस कधी झाला नाही तो या वर्षी झाला 
व जलसंधारणाच्या केलेल्या कामाची देणगी दिली.

दोन दिवसांत हे सर्वे तळे व ओढे भरून पाण्याने ओसंडत आहेत यामुळे तरूणांच्या चेहर्‍यावर आनंद व्यक्त होत आहेत मात्र या पावसाने शेतक-यांचे पिकाचे नुकसान केले आहे दरवर्षी कमी कालावधीत पैसे कमवून देणारे वाटाणा पिकाचे मुसळधार पावसाने नुकसान झाले आहे ऐन शेंगा काढायचा काळ आणि पाऊस आला त्यामुळे शेंगा सडल्या आहेत त्यास आता भाव मिळणार नाही अशी खंत शेतकरी व्यक्त करत आहेत एकीकडे पाऊस झाला याचा आनंदच आहेत मात्र हाती आलेले पिकाचे नुकसान झालेले दु:ख देखील शेतक-यांना झाले आहे.

शेतकरी बापु चत्तर म्हणाले, सहा एकर मध्ये वाटाणा पिकाचे पिक घेतले होते त्याकरीता 62 हजार रूपये खर्च आला होता. आता निघत आसलेल्या उत्पादनातुन मालाचे 22 हजार रूपये झाले.मात्र दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने हाती आलेले निम्मे पिक खराब झाले आहे त्यामुळे झालेला खर्च देखील वसुल होणार नाही.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain damage to agriculture at Kanhur Plateau in Parner taluka