
शेवगाव : तालुक्यात बुधवारी (ता.११) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे फळबागा, पिके व घरांचे प्रचंड नुकसान झाले. दहिफळ येथे अंगावर झाड पडल्याने एक महिलेचा मृत्यू झाला, तर दोन मुले जखमी झाले आहेत. भायगाव व दहिगावने येथे ही जनावरे दगावली आहेत. वादळी वाऱ्याने अनेक रस्त्यावर मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक खोळंबून पडली. विजेच्या तारा, खांब पडल्याने शहरासह अनेक गावात विद्युत पुरवठा खंडित झाला. तो चोवीस तासांनंतरही सुरळीत झाला नाही.