
-विनायक दरंदले
सोनई : नेवासेतून प्रथमच निघत असलेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी दिंडी पालखी सोहळ्यात सोनई येथील पांडुरंग पोपट येवले यांचा राजा नावाचा घोडा (अश्व) सहभागी करून घेतला आहे. ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ नामाचा गजर सुरू असताना वारकरी पावलीचा ठेका धरीत ‘राजा’ नेवासे ते पंढरपूर मार्गावर लक्ष वेधून घेईल. सोहळ्यात संधी मिळाल्याचे समजताच येवले परिवाराच्या आनंदाला पारावार उरला नाही.