
संगमनेर : अहिल्यानगर जिल्ह्याला नेतृत्वाची मोठी परंपरा आहे. विविध तालुक्यांमधील त्या नेत्यांनी त्या तालुक्यांना पुढे नेले आहे. अकोले व संगमनेर तालुका हा सह्याद्रीच्या पायथ्याशी असून या निसर्गरम्य तालुक्यांचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर तालुक्यात समृद्धी निर्माण झाली असून त्यांचा संपूर्ण राज्यामध्ये सर्वांना आदर आहे असे गौरवोद्गार अभिनेत्री राजश्री लांडगे यांनी काढले.