esakal | अखेर नगर जिल्हा परिषदेला मिळाले सीईओ
sakal

बोलून बातमी शोधा

Rajendra Kshirsagar Nagar Zilla Parishad CEO

आज (सोमवारी) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोकण विभागाचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र क्षीरसागर यांची बदली करण्यात आलेली आहे. तसा अध्यादेश सामान्य प्रशासन विभागातर्फे जारी करण्यात आलेला आहे. 

अखेर नगर जिल्हा परिषदेला मिळाले सीईओ

sakal_logo
By
दौलत झावरे

नगर ः कोकण अतिरिक्त विभागीय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्ती झालेली आहे. तसा अध्यादेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेला आहे. 

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांची 30 ऑगस्टला बदली. त्यानंतर सुमारे दीड महिना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीपदी कोणाचीच नियुक्ती झालेली नव्हती. मुख्य कार्यकारी पदावर कोणाची नियुक्ती होणार यावर जिल्ह्यात चर्चा सुरु होती.

आज (सोमवारी) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोकण विभागाचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र क्षीरसागर यांची बदली करण्यात आलेली आहे. तसा अध्यादेश सामान्य प्रशासन विभागातर्फे जारी करण्यात आलेला आहे. 

क्षीरसागर यांनी या अगोदर जिल्ह्यात जिल्हा पुर्नवसन अधिकारी म्हणून 2001 ते 2003 व संगमनेर प्रांताधिकारी म्हणून 2003 ते 2006 या दरम्यान म्हणून पदभार संभाळलेला आहे. त्यांनी या कार्यकाळात अनेक विधायक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास असल्यामुळे जिल्हा परिषदेतील कामकाज करताना त्याचा फायदा होणार असून जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागणार आहे.

क्षीरसागर हे लवकरच आपल्या पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. पाटील यांची बदली झाल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी जबाबदारी संभाळली आहे. 

दरम्यान, कोरोनामुळे राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या निधीत कपात केलेली आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या जागांचा सर्वे करून नवीन उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न सुरु केलेला होता. हे उत्पन्न वाढीचे आवाहन आता क्षीरसागर यांच्यासमोर राहणार आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर