esakal | तुम्ही तुरीचे एकरी किती उत्पन्न घेता? राहुरी विद्यापीठाच्या वाणाने शेतकऱ्याला केले मालामाल
sakal

बोलून बातमी शोधा

The Rajeshwari variety of Turi made the farmer wealthy

शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड व योग्य व्यवस्थापन केल्यास तूर हे पीक नगदी पिकांइतके उत्पादन मिळवून देईल यात शंका नाही. शिवाय या पिकाचा उत्पादन खर्चही कमी आहे.

तुम्ही तुरीचे एकरी किती उत्पन्न घेता? राहुरी विद्यापीठाच्या वाणाने शेतकऱ्याला केले मालामाल

sakal_logo
By
रहिमान शेख

राहुरी विद्यपीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा खरीप हंगामासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश व गुजरात या तीन राज्यांसाठी प्रसारीत करण्यात आलेल्या तुरीच्या फुले राजेश्‍वरी या वाणाने राज्यात क्रांती केली आहे. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी सकाळशी बोलतांना वरीला दावा केला. जागतिक कडधान्य दिनाच्या पार्श्‍वभुमीवर ते बोलत होते. 

मध्यम कालावधीसाठी असलेला हा वाण सुमारे 150 दिवसांमध्ये तयार होतो. मर व वांझ या रोगांना मध्यम प्रतिकारक आहे. या वाणाचे दाणे मध्यम प्रकारचे असून लाल रंगाचे आहेत. राज्यातील पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये तुरीचा बहुतांश भाग सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे आठ वर्षांपासून या वाणाचे संशोधन सुरु होते.

हेही वाचा - राष्ट्रवादीचे माजी आमदार जगताप यांची बिनविरोध एंट्री, भाजपचे आमदार पाचपुतेंपुढे पेच

विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख व डॉ. नंदकुमार कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथेही या पिकावर संशोधन सुरु होते. विद्यापीठाच्या या प्रकल्पाचे डॉ. चांगदेव वायाळ, युवराज पवार, डॉ. शहाजी शिंदे, डॉ. लक्ष्मण तागड, डॉ. राजेंद्र गेठे, डॉ. शेखर खडतरे यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रक्षेत्रांना भेटी देवून मार्गदर्शन केले आहे.

शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड व योग्य व्यवस्थापन केल्यास तूर हे पीक नगदी पिकांइतके उत्पादन मिळवून देईल यात शंका नाही. शिवाय या पिकाचा उत्पादन खर्चही कमी आहे. या पिकाचे एकरी 12 ते 14 क्विंटल उत्पादन घेतले असल्याची माहिती डॉ. कुटे यांनी दिली. एकरी साधारण एक किलो बियाणे लागते. एखाद-दुसऱ्या फवारणीत पीक हाती लागते.

संपादन - अशोक निंबाळकर