esakal | पित्राचे जेवण पडले महागात; तब्बल १८ जणांना झाली कोरोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

In Rajur of Akole taluka 18 corona positive

पित्राचा स्वयंपाक असल्याने त्याचे सर्व नातेवाईक एकत्र जमले. कावळ्याला घास दिला भोजन केले, न काय दबा धरून बसलेला कोरोना शरीरात प्रवेश करून एकदम १८ लोकांना त्याने बाधित केले.

पित्राचे जेवण पडले महागात; तब्बल १८ जणांना झाली कोरोनाची लागण

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : पित्राचा स्वयंपाक असल्याने त्याचे सर्व नातेवाईक एकत्र जमले. कावळ्याला घास दिला भोजन केले, न काय दबा धरून बसलेला कोरोना शरीरात प्रवेश करून एकदम १८ लोकांना त्याने बाधित केले. मग काय एकच धावपळ उडाली. दवाखाने फुल्ल झाले. काही संगमनेर तर काहींना अकोले येथे ॲडमिट करावे लागले. त्यात महिला पुरुष, लहान मुले, तरुण- तरुणी यांचा समावेश आहे. 

तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सुरु असून प्रत्येक गावात, रुग्ण आढळून येत आहे. गणपती विसर्जन झाले अन्‌ पितूरपाट सुरु झाला. प्रत्येकाच्या घरात आपल्या पूर्वजांना नेवैद्य दिला जातो. काही याला अंधश्रद्धा तर काही श्रद्धा म्हणतात. या कार्यक्रमाला विविध पदार्थही करून नातेवाईकांना जेवणासाठी बोलविले जाते. ब्राम्हण पूजन दक्षिणा, कावळ्यांना आमंत्रण असते. घास दिला की मग भोजन असते. यावेळी घरभर पाहुणे जेवणासाठी असतात. 

राजूरमध्येही एका कुटुंबात असेच झाले. हे पितरांचे जेवण उपस्थितांना महागात पडले आहे. अचानक सर्दी, खोकला सुरु झाला. त्यांना राजूर ग्रामीण रुग्णालय, खानापूर येथे ४७ व्यक्तींचे तपासणी करण्यात आली. त्यात १८ व्यक्ती बाधित निघाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर राजूर सरपंच, तलाठी, ग्रामसेवक सहायक पोलिस निरीक्षक यांनी तातडीची बैठक घेऊन राजूर गाव पाच दिवसासाठी जनता कर्फ्यू माध्यमातून बंद केले आहे. बाहेरच्या व्यक्तीला आत येऊ दिले जात नाही व्यवहार बंद आहेत. तहसीलदार मुकेश कांबळे यांनी पितरांसाठी व जेवणासाठी एकत्र न येण्याचे आव्हान केले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर