eco friendly
eco friendly sakal

Raksha Bandhan 2023 : गाईचे शेण, तुळशीच्या मंजुळांपासून राख्या राऊत दाम्पत्याची पर्यावरणपूरक निर्मिती

मोबाइल व यूट्युबची मदत घेऊन राऊत दाम्पत्याने त्यांना सूचलेल्या संकल्पनेला प्रत्यक्ष साकारून ऑरगॅनिक राखी तयार करून त्यास मूर्त रुप दिले
Published on

Ahmednagar : येथील राऊतवस्तीवरील नीकिता राऊत व मिलिंद राऊत या दाम्पत्याने राखी पौर्णिमेनिमित्त गाईचे शेण व तुळशीच्या मंजुळापासून मनमोहक अशा पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत.

राशीनमध्ये यशोदानंद गोशाळा चालविण्याचे काम हे दाम्पत्य करीत आहे. गावरान गाईचे शेण आणि तुळशीच्या मंजुळा याचा वापर करून विविध प्रकारची नक्षी, फुले व डिझाईनच्या स्वरूपात साकारलेल्या. या राख्या पाहता क्षणीच अनेकांना भावतात.

मोबाइल व यूट्युबची मदत घेऊन राऊत दाम्पत्याने त्यांना सूचलेल्या संकल्पनेला प्रत्यक्ष साकारून ऑरगॅनिक राखी तयार करून त्यास मूर्त रुप दिले आहे. ही राखी जरी शेणापासून बनविली असली, तरी पाण्यामध्ये लगेच विरघळत नाही. तसेच मातीत पडल्यानंतर त्यामधून तुळशीचे रोप तयार होईल. किंवा ही राखी एखाद्या झाडाच्या बुडाला टाकल्यास त्यास खत म्हणून त्याचा उपयोग होईल.

eco friendly
Latur Pattern: लातूरच्या सुपुत्राचा पगार आहे चक्क 78 कोटी, वय आहे फक्त 37 वर्षे

त्यामुळे या राख्या भावा-बहिणीचे प्रेम अधिक घट्ट करण्यासोबत पर्यावरणाला पूरक ठरणार आहेत. राऊत दाम्पत्याने पर्यावरण पूरक राखी तयार केल्याबद्दल राशीनसह परिसरातील पर्यावरणप्रेमी मंडळीकडून त्यांचे कौतुक होत आहे.

eco friendly
Bihar Exam : शिक्षक भरती परीक्षा की कुंभमेळा? बिहारमधील बेरोजगारीचं भीषण वास्तव

येन बद्धो बलि राजा दानवेंद्रो महाबल ।

तेन त्वामभिबध्नमि रक्षे मा चल मा चल ।।

भारतीय संस्कृतीत रक्षाबंधनाला विशेष महत्त्व आहे. ज्या रक्षासूत्राने महान शक्तिशाली दानवेंद्र राजा बलीला बांधले होते, त्या रक्षाबंधनाने तुला बांधत आहे. ही तुमची रक्षा करेल, संकटात तू माझी रक्षा कर, असे श्लोक संस्कृतमध्ये म्हटले आहे.

eco friendly
Nashik News : चोरट्यांनो या, पिंपळगावात आपले स्वागत आहे! सुरक्षेचा कडलोट झाल्याने या गावात हा फलक लावणेच बाकी...

भारतीय संस्कृतीक गोरक्षनाला महत्त्व आहे. या राख्या गावरान गाईचे शेण व तुळशीच्या मंजुळेपासून तयार केल्या आहेत. त्यामागे अर्थाजनपेक्षा निसर्गाचा विचार आम्ही केला आहे. आकर्षक व स्वस्त असल्याने ग्राहकांना भावतात.

- नीकिता राऊत

पर्यावरण व संस्कृती यांचा मेळ आम्ही या राख्यांच्या माध्यमातून घातला आहे. वेगळेपण असणारी ही राखी रक्षाबंधनासमवेत पर्यावरण जागृतीचे काम करणार आहे.

मिलिंद राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com