राळेगणसिद्धीत अण्णा पक्षाचाच विजय! अपक्षांची उचलबांगडी, मापारी, औटी पॅनलला सर्व जागा

एकनाथ भालेकर
Monday, 18 January 2021

राळेगण सिद्धी ः  राज्याचे लक्ष लागलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या आदर्श गाव राळेगणसिद्धी  ग्रामपंचायत निवडणुकीत लाभेष औटी व जयसिंग मापारी यांच्या राळेगणसिद्धी ग्रामविकास मंडळाने मोठ्या फरकाच्या मतांनी सर्व जागा जिंकत ९ - ० ने  विजय मिळवला.

हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ४५ वर्षांत एक दोन अपवाद वगळता राळेगणसिद्धीत बिनविरोध निवडणूकीची परंपरा होती. या वेळी आमदार निलेश लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाभेष औटी व जयसिंग मापारी यांचे दोन गट प्रथमच बिनविरोध निवडणुकीसाठी एकत्र आले होते.

जिल्ह्यात सर्वात प्रथम राळेगणसिद्धीची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे त्यांनी जाहीर केले होते. हजारे यांनीही या निर्णयाचे स्वागत केले होते. अपक्षांच्या गटांनी काही जागांवर उमेदवारी कायम ठेवल्याने फक्त २ जागा बिनविरोध होऊन ७ जागांसाठी ग्रामपंचायत निवडणूक झाली होती.  

हेही वाचा - नेवाशात मंत्री गडाख, दुसरं कोण येणार

प्रचार शांततेत प्रचार होऊन मतदानही शांततेत पार पडले होते.
विजयानंतर औटी व मापारी यांच्यासह समर्थकांनी पद्मवती देवीचे दर्शन घेत गुलाल उधळून जल्लोश केला.  

राळेगणसिद्धी ग्रामविकास मंडळाचे  विजयी उमेदवार व मिळालेली मते (कंसात) पुढीलप्रमाणे ः जयसिंग मापारी (विजयी, ३८५ मते),  मंगल मापारी (विजयी ४१० मते), मंगल पठारे (विजयी ४६४ मते ), लाभेश औटी (विजयी ४०२ मते ),  सुनिता गाजरे (विजयी ४६० मते), अनिल मापारी (बिनविरोध) , डॉ. धनंजय पोटे ( विजयी ३३३ मते ), मंगल उगले (विजयी ३१६ मते ), स्नेहल फटांगडे (बिनविरोध ).

किसन पठारे, विजय पोटे, विजया पठारे, उज्वला गाजरे, शंकुतला औटी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. अहमदनगर

आमचा कोणताही पक्ष नव्हता अण्णांचे विचार हाच आमचा पक्ष आहे. यापुढील काळात अण्णांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा विकास आम्ही दोन्ही गट एकत्रितपणे करणार आहोत.

डॉ. धनंजय पोटे - विजयी उमेदवार

संपादन - अशोक निंबाळकर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Ralegan Siddhi, the panel of Mapari and Auti won